|
आमची प्रकाशन व्यवसाय सेव ग्रंथायन हे मराठी व इंग्रजी पुस्तकांच्या प्रकाशनातील लखलखत अस एकमेव नाव, जे भारतातील अन्य प्रांतीय भाषांतूनही पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय ठेवतय.
ग्रंथायन ही संस्था नव्या नवोन्मेष साहित्यिंकाच्या पुस्तकांची निर्मिती करण्यासाठी सदैव तत्पर असणार आहे. यासाठी प्रकाशणासाठी उत्तम् 5 सेवा आम्ही त्यांना देणार आहोत.
1. संगणकीय अक्षरज़ुळणी
2. मुद्रतशोधन
3. संपादकीय संस्कार / भाषाशैली संस्कार
4. छ्पाई
5. वितरण व विक्री
|
|
वरील प्रत्येक सेवेस ग्रंथायन व्यावसायिक दुर्ष्टीने काही शुल्क आकरणार आहे. पण त्यात असेल पूर्णपणे पारदर्शकता हा सारा व्यवहार पूर्णपणे काययदेशीर कराराच्या स्वरूपात असेल. अर्थात, ग्रंथायनच्या व लेखकाच्या स्वाक्षरीने. ज्यात द्वोघांचे हित व फायदा असेल.
|
|
निर्मितीचा खर्च
1. अक्षरज़ुळणी 30 रुपये प्रति पान.
2. मुद्रतशोधन 15 रुपये प्रति पान.
3. संपादकीय संस्कार 45 रुपये प्रति पान.
4. छ्पाई, बाईडींग पानांच्या हिशेबानुसार.
5. वितरण, विक्री व प्रसिद्धीसाठी 10,000 रुपये मात्र.
|
|
मुंबईच्या लेखकांसाठी धनादेश व मुंबईबाहेरील लेखकांसाठी धनाकर्षद्वारा (डिमांड ड्राफ) रक़्क़म देता येईल.
या अभियान संकल्पनेत भारताच्या भाषिक वैविध्याच्या पलीकडे जाउन एकच छ्त्राखाली विविध प्रांतातील पुस्तकांचा अनुवाद करण्याचाही समावेश आहे.
|
|
लेखकाने पाठविलेली ह्स्तलिखित व टनकलिखिताबाबत्
लेखकाने ह्स्तलिखित व्याकरण व संकल्पनेवच्या दृष्टीने योग्य आहे की नाही ते संपादकीय दृष्टिकोनातून पडताळ्ले जाईल व त्यावर संस्कार केले जातील. तरीही लेखकाचा शब्द हा अंतिम असेल!
ग्रांथायन पुस्तकनिर्मितीच्या उच्च दर्जाबद्दल दक्ष असेल.
|
|
वितरण आणि विक्री पुस्तक महाराष्ट्रातील केवळ प्रमुख शहरच नाहीत तर प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात वितरीत होतील. याशिवाय ग्रंथायनच्या ग्रंथायन.कॉम या वेबसाईटवर देखील ही पुस्तक विक्रीस उपलब्ध असणार आहेत.
प्रसार व मुद्रित माध्यमाद्वारे आम्ही सर्व पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयन्त नक्कीच करू.
या व्यतिरिक्त या पुस्तकांवरील परीक्षणे चांगल्या जाणकारांकडून लिहून घेऊन ती महाराष्ट्रातील मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याचे प्रयन्त असतील, जे लेखकांना नक्कीच साहाय्यभूत ठरतील.
ग्रंथायनच्या वितरण व्यवस्थेद्धारे महाराष्ट्रातील अन्य प्रकाशकांचीही नवीन पुस्तक वितरीत केली जातील.
पुस्तकांची विक्री ही ग्रंथायन ते थेट वाचक यांच्यतच होणार असल्याने कोणीही मद्यस्थ नसेल. त्यामुळे पुस्तकांची किंमत बाजारातील किमतीपेक्षा 25 टक्कयानी कमी असणार आहे.
याबरोबरच नवोदिताना जे आमच्या या योजनेत पुस्तक प्रकाशनासाठी पैसे गुंतवणार आहेत त्यांना 50 टक्के रॉयल्टी मिळणार आहे.
|
|
प्रस्थापित लेखकांसाठी प्रकाशनातील निर्मिती सेवा प्रस्थापित लेखकांना कोणतेही शुल्क न अकारता दिली जाईल. तीही 30 टक्के रॉयल्टीसह. अर्थात, त्यांच्या पुस्तकांच्या कमीत कमी 400 प्रतींच्या विक्रनंतर. म्हणजेच प्रकाशनाच्या निर्मितीचा खर्च वसुल झाल्यानंतरच. त्यानंतर लेखक आयुष्यभर त्या रॉयल्टी च फायदा घेऊ शकतो. या सार्या गोष्टी आमच्या करारात नमूद केलेल्या असतीलच.
|
|
लेखकांच्या पुस्तक विक्रीच्या हिशेब प्रस्थापित आणि नवोदित लेखकांच्या पुस्तक विक्रीचा हिशेब वर्षातून दोनदा ठरलेल्या वेळी ठरलेल्या महिन्यात होईल.
आमच स्वप्न आहे की, कोट्यवधी लिहिते हात निर्माण व्हावेत, ज्यामुळे ते कायम आपल्या कल्पकतेत आनंदाने रममाण होतील.
|